Share

गर्भवती नवविवाहितेची आत्महत्या; हुंड्यासाठी बळी घेतल्याचा माहेरच्यांचा आरोप

Published On: 

औरंगाबाद : पुंडलिकनगर भागात नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी समोर आली. तिला सासरच्यांनी घाटीत दाखल करून पोबारा करत हुंड्यासाठी बळी घेतल्याचा आरोप नवविवाहितेच्या माहेरच्यांनी केला. पूजा अमोल त्रिभुवन वय २० असे नवविवाहितेचे नाव आहे. मयत पूजा ही सात महिन्याची गर्भवती असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

प्राप्त माहिती नुसार, पुंडलिकनगर भागात राहणाऱ्या पूजा त्रिभुवन हिचा विवाह दहा महिन्यांपूर्वी अमोल त्रिभुवन याच्याशी झाला होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान सासरे यांना पूजाने राहत्याघारातील बेडरूम छताच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पूजाला फासावरून उतरवत तिला घाटी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले.

दरम्यान, दहा महिन्यांपूर्वी पूजाचे लग्न अमोल त्रिभुवन याच्याशी झाले होते. चार महिन्यानंतरच त्यांच्याकडून पुजाला त्रास देण्यास सुरुवात झाली. पुजाला सासरचे लोक प्लॉट खरेदीसाठी सहा महिन्यांपासून दहा लाखाची मागणी करत तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. पूजाने आत्महत्या केली नसून हुंड्यासाठी सासरच्यांनी तिचा बळी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!