Share

संभाजीराजेंची गादी श्रेष्ठ, त्यांनी भाजपच्या खासदारीला लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव

Published On: 

उस्मानाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती केली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. त्यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजेंनी भाजपकडे कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करावी. नसता, त्या पेक्षा ते जी गादी सांभाळत आहेत, ती श्रेष्ठ आहे. त्यासाठी त्यांनी भाजपच्या खासदाकीला लाथ मरायला हवी, असे मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. जाधव सध्या मराठवाड्याचा दौरा करत आहेत. त्या निमित्त उस्मानाबादेत ते पत्रकारांशी बोलत होते.

एकिकडे भाजपच्या वतीने देण्यात आलेली खासदारकी ठेवायची आणि दुसरीकडे राज्यभर दौरा करुन आंदोलन करायची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्या ऐवजी ज्या प्रमाणे मी आमदारकीचा राजीनामा दिला होता, तसा त्यांनी खासदारकीचा राजीनामा देवून आंदोलनाचे नेतृत्त्व करावे, असेही जाधव म्हणाले.

माजी आमदार हर्षवर्धन जावध हे ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच क्रांती दिनानिमित्त मराठा आरक्षणासाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणार आहे. या निमित्त त्यांनी खासदार संभाजीराजेंनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच मराठा समाजातील नागरिकांनीही दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!