औरंंगाबाद : सिडको एन-९ परिसरातील पवननगर येथे राहणाऱ्या रमाकांत दिवाकरराव पांडे (वय ६०) या वृध्दाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ११ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
रमाकांत पांडे यांनी आपल्या खोलीतील सिलिंग पंख्याला ओढणीच्या सहाय्याने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी रमाकांत पांडे यांना फासावरून उतरवून उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रमाकांत पांडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
- पुणेकरांना किंचित दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

