पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि ३ हजारांपार गेली होती. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे. दरम्यान, आज पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असून नव्या कोरोना बाधितांमध्ये आज घट झाली आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा अधिक आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आज ३ हजारांच्या खाली आली आहे.
आज (दि. १२ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल १८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ०२३ इतकी झाली आहे. शहरातील २७९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७० हजार ३७६ झाली आहे.
तर, पुणे शहरात सध्या २ हजार ९९१ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २२५ रुग्ण गंभीर तर ४९६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्यांना लोकलप्रवासाची मुभा द्या नाहीतर पाच हजार प्रवास भत्ता द्या’; भाजपची मागणी
- आता गडकरीही म्हणाले, ‘इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप’; सुचवला ‘हा’ पर्याय
- संभाव्य तिसऱ्या लाटेत उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहावे यासाठी प्रयत्न करा – उद्धव ठाकरे
- ‘नितेश राणेंसारखी प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही’; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला
- संभाजीराजेंची गादी श्रेष्ठ, त्यांनी भाजपच्या खासदारीला लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव


