🕒 1 min read
औरंंगाबाद : रात्री सहका-यांसोबत जेवण करून गप्पा मारल्यानंतर लष्करी जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास छावणीतील लष्कर परिसरात उघडकीस आली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मल्हार राममूर्ती (वय २६, रा. कृष्णगिरी, तामिळनाडू, ह. मु. लष्कर निवास्थान) असे मृत जवानाचे नाव आहे. मल्हार राममुर्ती यांनी शनिवारी रात्री सहका-यांसह नेहमी प्रमाणे जेवण केले. त्यानंतर हसतखेळत त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर सर्व जण झोपी गेल्यानंतर मल्हार राममुर्ती यांनी लाइनमॅन कडे असलेल्या दोरीने गळफास घेतला.
सकाळी सहा वाजता सहकारी उठल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. सुभेदार पोपट जाधव व त्यांच्या सहकार्यांनी मल्हार राममुर्ती यांना बेशुद्धावस्तेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भागीले करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
- राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
