औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील विवाहीत महिलेने शुक्रवारी दि.२ दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सुरेखा अर्जुन जाधव (२७) असे असुन तिचे माहेर व सासर केळगावचे होते.
विवाहीत महिला ही तिन ते चार महिन्यांपासून माहेरीच होती. मयत सुरेखाची हारनियाची शस्त्रक्रिया झाल्याने विश्रांतीसाठी ती माहेरीच होती. बेशुद्ध अवस्थेत तिला उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
आत्महत्येचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुरेखा यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, सासू-सासरे, आई-वडिल असा परिवार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

