Share

Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव; सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर राऊतांची टीका

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut। मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. आज सोनिया गांधी या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज देशभरात आंदोलने केली गेली. त्यामुळे आज दिवसभर देशातील राजकीय वातावरण तापलेलं होत. असं असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांच्याविरोधात ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करतात ते सर्वांना माहीत आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष देश हितासाठी प्रश्न विचारत आहोत. सातत्याने अन्यायाविरोधात आवाज उठवत आहोत. पण आमचा आवाज दाबण्यासाठी चौकशी होत आहे. सोनिय गांधी, राहुल गांधी किंवा मी कोणी असो जो सवाल विचारेल. त्याला धमकावलं जातंय. दबाव आणला जातोय, तुरुंगात टाकलं जाण्याची धमकी दिली जातेय. पण आम्ही या सर्वासाठी तयार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर टाच आणण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काही संपत्तीवर आधीच टाच आणली होती. आता पुन्हा एकदा ईडीने पटेल यांच्यावर कारवाई केली आहे.सीजे हाऊस ही बिल्डिंग वरळीत, अॅट्रिया मॉलच्या समोरच्या परिसरात आहे. याच ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!