औरंगाबाद: सरपंचपदाच्या रूपाने महिला आता फ्रंटसीटवर बसल्या आहेत. पतीराजांनी त्यांच्या कारभारात लुडबूड न करता स्टेअरिंग त्यांच्या हातीच राहू द्यावे, त्यांच्या पाठीशी राहून त्यांना काम करू द्या, त्या अप्रतीम काम करू शकतात एवढा विश्वास त्यांच्यावर टाका, असा सल्ला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिला. महिला सरपंचांनी आपल्या गावातील कुठलेही एक काम सुचवले तर ते जिल्हा नियोजन कडून तात्काळ मंजूर करण्यात येईल, अशी सुखद भाऊबीज भेट पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित महिला सरपंचांना दिली.
महिला सरपंच परिषदेच्या समारोपप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी महिला सरपंच ज्या विश्वासाने काम करीत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी रोहयोमंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, प्रशांत बंब, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. रोहयो अंतर्गत भरपूर योजना असून, भरपूर निधीही आहे. महिला सरपंचांनी आपल्या गावांमध्ये कामे करून घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी बोलताना केले.
आयोजक आमदार अंबादास दानवे यांनी या परिषदेला ५८२ पैकी ५२९ महिला सरपंच हजर असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. महिला सदस्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण शिबिर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच वर्षा जाधव, वनमाला निकम, मीना वैद्य, सरला कांबळे, वैशाली अशोक शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व गावात केलेल्या कामांचा आढावा घेतला. गाव व्यसनमुक्त झाले तर गाव सुखी होण्यास मदत होईल, असे सांगताना वाहेगाव देमणी येथील सरपंच वैशाली शिंदे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. महिला सरपंचांना मुक्तपणे काम करू द्या, त्याचा निश्चितच फायदा होईल, असे त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात
- प्रकृती बिघडल्याने रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल
- अंडरवर्ल्ड संबंधाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मलिकांनी केला गोपीनाथ मुंडे आणि दाऊदचा नामोल्लेख, म्हणाले..
- उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार- नवाब मलिक
- ‘हे तर ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक’, भाजपची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

