Share

प्रकृती बिघडल्याने रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल

Published On: 

🕒 1 min read

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची ताप वाढल्यामुळे प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी रात्री पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सातारा येथे जिल्हा बँकेच्या बैठकीसाठी निंबाळकर उपस्थित होते.

मध्यरात्री अचानक ताप वाढल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ताप वाढल्याने रामराजे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मंगळवारी सकाळपर्यंत रामराजेंना बरे वाटू लागले असून सायंकाळपर्यंत घरी सोडतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले व रामराजे नाईक निंबाळकर यांची सोमवारी फलटण येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने गोपनीय बैठक झाली होती. सदरील बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय होईल, जागावाटप देखील करायचे आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता; परंतु रामराजे हॉस्पिटलमध्ये असल्याने या बैठकीत निर्णय होईल का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!