🕒 1 min read
मुंबई : छोटया पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नुकतच या मालिकेत इंद्राचे पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे. त्याने स्वत: एक व्हिडीओ पोस्ट करत सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ मोठयाप्रमाणात व्हायरल झालाय.
अजिंक्यने या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर त्याने “नमस्कार मी अजिंक्य राऊत, आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली. वर्षातून एकदा दरवर्षी दिवाळीला मी परभणीला जातो. यंदाही मी जाताना रस्त्यात माझ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी सुखरुप आहे.” असे त्याने सांगितले.
https://www.instagram.com/tv/CWA9N6aImJB/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओवर ‘तुम्हाला मिळालेला प्रत्येक दिवस फार कृतज्ञतेने जगा’, असे कॅप्शन असून हा व्हिडीओ अपघातानंतरचा आहे. अजिंक्य शुद्धीवर आल्यानंतर त्याने हा व्हिडीओ शूट केला असून त्याने देवाचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. “आताच आमच्या गाडीचा अपघात झाला आहे. पण आता आम्ही ठीक आहोत. नशिबाने आमच्या गाडीचा वेग नियंत्रणात होता, म्हणून खूप भयावह असे काही घडले नाही. तसेच आजूबाजूला दरी असणारा रोड नव्हता. आमची गाडी स्केट झाली आणि ती ११०० व्होल्टच्या खांबावर आदळणार होती पण मित्राने ती आदळू नये यासाठी ती कंट्रोल केली. मात्र तरीही ती स्केट झाली. पण झाडीमुळे आम्ही वाचलो..’असे तो म्हणाला. दरम्यान ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत सध्या दिवाळी सण साजरा केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू- नवाब मलिक
- ‘माझ्या मंत्रिमंडळातील कोणत्याच मंत्र्यांला हिंदी कळत नाही’, मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र
- ‘पप्पांना मृत्यू आधीच दिसला होता का?’ आर.आर.पाटलांच्या मुलीची भावूक पोस्ट
- ‘सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिहासात नोंद होईल’
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

