Share

अंडरवर्ल्ड संबंधाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मलिकांनी केला गोपीनाथ मुंडे आणि दाऊदचा नामोल्लेख, म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत. नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली, असा दावाही त्यांनी केलाय.

यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते. पण त्यांचे फटाके भिजल्यामुळे त्याचा आवाज नाही आला’. अंडरवर्ल्डशी संबंधाच्या आरोपांवर मलिक म्हणाले, ‘देवेंद्रजी आपण १९९९ मध्ये मुंबई शहरात पहिल्यांदा आमदार बनून आले. ६२ वर्षाच्या आयुष्यात या शहरात तुमच्याआधी दिवंगत दिवंगत मुंडे साहेब होते जे दाऊद सोबत लोकांना जोडत होते. आम्ही मंत्री होतो तेव्हा सुद्धा मुंडे साहेबांचे भाषण विधानसभेत होत असत. परंतू एवढ्या वर्षात आमच्यावर कोणी आरोप लावू नाही शकले. आज एका जागेसंदर्भात काही कागदपत्र तुम्ही लोकांसमोर ठेवले. कवडीमोल जमीन आम्ही माफियांकडून खरेदी केली, असा आरोप तुम्ही केला. पण तुम्हाला माहिती देणारे कच्चे खिलाडी आहेत’.

‘देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केल्याचे मलिक यांनी म्हटले. तसेच, सलीम पटेल आणि सरदार वली खानबद्दलही माहिती दिली. सरदार वली खानचे गोवावला कंपाऊंडमध्ये आजही घर आहे.

गेल्या ७० वर्षांपासून त्याच कंपाऊंडमध्ये वली खानचे वडील हे गोवावाल परिवारासाठी एका वॉचमनचं काम करत होते. जेव्हा आम्ही गोवावाला कुटुंबीयांकडून ही संपत्ती घेतली, त्यावेळी वली खान यांनी ३०० मीटर जागेवर आपलं नाव लावून घेतलं होतं. ज्यावेळी आम्ही नोंदणी कार्यालयात गेलो, तेव्हा ३०० मीटरचे पैसे देऊन आम्ही जागा विकत घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

आम्ही कुठल्याही दबावात किंवा अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या आरोपींकडून आम्ही ही जागा विकत घेतली नाही, असे मलिक यांनी सांगितले. आम्ही पूर्णपणे भाडेकरू होतो, जागेच्या मालकीनीने आम्हाला जागा विकत घेण्याचं सांगितलं, तेव्हा तेथील वॉचमनने जागेवर आपलं नाव लावलं होतं, म्हणून आम्ही त्यास पैसे दिल्याचं मलिक यांनी स्पष्टीकरण दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!