बीड: एका वैद्यकीय अधिकाऱ्याने एका मुलीसोबत साखरपुडा केला तर दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. हा काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असणार, हे प्रकरण असं आहे की, एका डॉक्टरने, तुमच्या मुलीशी लग्न करतो फक्त मला लातूरला दवाखाना सुरू करण्यासाठी सात लाख रुपये द्या असे म्हणतो, सांगीतल्याप्रमाणे साखरपुडा झाला आणि पैसे घेऊन डॉक्टर फरार झाला. आणि नंतर दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील करून टाकलं. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा येथील शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
परळी वैजनाथ येथील सोमेश्वर नगर परिसरातील डॉ. संदीप वसंतराव मंत्रे सध्या लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर २०२० संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. २३ सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला.
मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे २८ एप्रिलला सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न ५ मे २०२१ ला करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, २३ मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर ४ एप्रिलला डॉ संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये सोशलमिडीयाचा माध्यमातून सांगून लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर येथील शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खोटी कागदपत्रे दाखवून लाटली जात आहेत शिवभोजन थाळी केंद्र, मर्जीतील व्यक्तींना होतेय केंद्राचे वाटप
- ‘कर्ज काढताना शेतकऱ्यांना फसवले, आता कर्ज भरताना तरी शेतकऱ्यांना पुन्हा फसवू नका’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- ‘बेपत्ता आमदार प्रताप सरनाईक मातोश्रीवरच’ ; भाजपचा खळबळजनक दावा
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येताच शिवसेना-भाजप संघर्षाचा भडका उडणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

