नागपूर – कोरोना काळात गरिबांना मोफत जेवणाची सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. यासाठी नियमावली देखील जाहीर करण्यात आली होती मात्र आता नेत्यांच्या मर्जीतील व्यक्ती, संस्था, बचतगटांना केंद्राचे वाटप केले जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेकांना केवळ राजकीय वरदहस्तातून केंद्र भेटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
असाच काहीसा प्रकार आता नागपूरमध्ये घडला असून शिवभोजन थाळी संदर्भात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊ लागल्या आहेत. काहींना कागदपत्रे सादर न करताच शिभोजन थाळी केंद्र चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर काहींनी खोटी कागदपत्र, सह्या घेऊन शिवभोजन थाळी केंद्र लाटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
रद्द केलेली केंद्र सुद्धा मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या पत्राने ही केंद्र पात्र ठरवण्यात आली आहेत. माहिती अधिकारतून ही माहिती समोर आली आहे. काही लाभार्थ्यांनी खोटी अनुभव पत्रे दिली आहेत तर लाभार्थ्यांनी खोटे भाडे करारपत्र दिले आहेत. काहींनी तर एका घरात ४-४ केंद्र बळकावली आहेत.भास्कर पराते यांनी अशा पद्धतीने ही केंद्र लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. आता ही केंद्रे रद्द करावी आणि नव्याने निविदा काढून प्रक्रिया करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवभोजन केंद्र वाटपात झालेल्या गैरप्रकाराची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेना नेते शेखर सावरबांधे यांनी सांगितले आहे.दरम्यान, आता अशा पद्धतीने केंद्र बळकावण्याचा प्रकार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजेश टोपे राज्याचे नाही तर जालन्याचे आरोग्यमंत्री’, आ. धसांचा टोला
- ‘कर्ज काढताना शेतकऱ्यांना फसवले, आता कर्ज भरताना तरी शेतकऱ्यांना पुन्हा फसवू नका’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- ‘बेपत्ता आमदार प्रताप सरनाईक मातोश्रीवरच’ ; भाजपचा खळबळजनक दावा
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येताच शिवसेना-भाजप संघर्षाचा भडका उडणार ?


