वैजापूर : एकीकडे कोरोनाने दहशत घातलेली आहे. तर दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सरकारने पोषण आहारातून खाद्यतेलच गायब केली असून आता तेलाऐवजी साखर देऊन कोरोनाच्या काळात तोंड गोड करून घ्या असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती अंगणवाडीतील पोषण आहार लाभार्थ्यांची झाली आहे.
राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अंगणवाडीतून तीन ते सहा वयोगटातील बालके, गरोदर मातांना पूरक पोषण आहार पुरवला जात होता. अंगणवाडी मध्ये तो शिजवून बालकांना वाटला जात होता. पण कोरोनामुळे शिजवण्यावर निर्बंध आल्याने त्यांना साहित्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली. लॉकडाऊनमध्ये याचा चांगला लाभ लाभार्थ्यांना झाला. त्या पोषण आहारात गहू, मसूर डाळ , मूग डाळ, एक किलो खाद्य तेल दिले जात होते.
मात्र आता तेलाचे भाव १६० ते २०० रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे सरकारने हात आखडता घेतला आहे. तेलाऐवजी आता साखर देण्यात येत आहे. पूर्वी चार किलो गहू, दोन किलो चना डाळ, १.५ किलो मुगडाळ, एक किलो साखर, २०० ग्राम हळद, २०० ग्राम मिरची, ५०० ग्राम मीठ देण्यात येत होते. याविषयी वैजापूरच्या अंगणवाडी विभागाने सांगितले, बालविकास विभागाकडून धान्य उपलब्ध होते त्याप्रमाणे ते वाटप केले जाते. या अगोदर खाद्यतेल अर्धा किलो दिले जात होते. मात्र आता तेलाचा पुरवठा बंद झाला आहे. लाभार्थ्यांकडून याबाबत विचारणा होते. मात्र आम्ही काहीही करू शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेतही ‘लसी’नं झपाटलं…अंगाला स्टील चिटकलं, चुंबकत्व चमत्काराचा मात्र होतोय इन्कार!
- पर्यटनाच्या राजधानीत झक्कास पठाराला वेग, सारोळा येथे अडीच हेक्टर वर बीजारोपण
- नियमांचे पालन आणि लसीकरणात वाढ हाच उपाय, आ. दानवे यांचा कोरोना मुक्त गाव मोहिमेत पुढाकार
- आधारकार्ड नोंदणी ऑनलाईन कामासाठी सवलत देण्याची अल्पसंख्यांक संस्था महासंघाची मागणी
- वयोवृद्ध दांपत्याच्या घरावर चोरांचा डल्ला, २८ तोळे सोने लंपास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

