औरंगाबाद : प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे ऑनलाईनच्या कार्यात बाधा येत आहे. या परिस्थितीचा विचार करता आधारकार्ड नोंदणी व इतर ऑनलाईनच्या कामासाठी सवलत देवून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अल्पसंख्यांक संस्था महासंघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे ९० टक्के आधारकार्ड प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी. अल्पसंख्यांक संस्थेतील शाळेतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता त्वरीत देण्यात यावी. विद्यार्थ्यांना आधारकार्ड नोंदणी आभावी शिक्षकांचे वेतन थांबवण्यात येवू नये. सर्व शाळांच्या आरटीईच्या प्रमाणपत्रास मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे ऑनलाईनच्या कार्यात बाधा येत आहे. या परिस्थितीचा विचार करता आधारकार्ड नोंदणी व इतर ऑनलाईनच्या कामासाठी सवलत देवून मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी अल्पसंख्यांक संस्था महासंघातर्फे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाचे अध्यक्ष हाजी लतीफ पटेल, कार्याध्यक्ष प्रकाश सोनवणे, बी.जी. गायकवाड आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा निर्बंध पुन्हा नव्याने लावावे लागतील ; वडेट्टीवारांचा इशारा
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

