Share

नियमांचे पालन आणि लसीकरणात वाढ हाच उपाय, आ. दानवे यांचा कोरोना मुक्त गाव मोहिमेत पुढाकार

Published On: 

औरंगाबाद : शहरी भगापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव जास्त आहे. औरंगाबाद शहर अनलॉक झाले असले तरी अद्याप ग्रामीण भागात रुग्ण संख्या जास्त आहे. यात घट होत असली तरी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन आणि लसीकरणात वाढ हा एकमेव उपाय असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

‘निर्धार कोरोना मुक्त गाव’ या माेहिमेची सुरूवात शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुख अंबदास दानवे हे प्रत्येक गावात जावून कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच उपाय योजना करण्यासंबंधीत सुचना देखील देत आहे. या अंतर्गत रविवारी दानवे यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील केसापुरी, करोडी, पाटोदा, भानुदासनगर, देवळाई, सिंदोन-भिंदोन तांडा, शिवगड तांडा आदी ठिकाणी भेट दिली.

या भेटी दरम्यान आमदार दानवे यांनी ग्रामस्थांना कोरोना संबंधीत नियम कोटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. तसेच गावात जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्याचा निर्धार देखील त्यांनी या वेळी व्यक्त केला. लसीकरणाचा वेग वाढत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर उपाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!