औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. या ठिकाणी पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी साताऱ्यातील कास पठाराच्या धर्तीवर जिल्ह्यातील गौताळा, भेंडाळा, सारोळा, व्हीव पॉईंट आणि शहरातील गोगाबाबा टेकडी अशा जवळपास २० हेक्टरवर गवत पुष्पांचे रोपन जागतिक पर्यावरण दिनापासून याची सुरुवात करण्यात आली होती. त्यानुषंगाने रविवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी सारोळा येथे अडीच हेक्टर वर बीजारोपण केले.
रविवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गोंदावले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील अधिकारी, स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांनी सारोळा येथे येऊन जवळपास अडीच हेक्टरवर २० पेक्षा जास्त रानफुलांच्या प्रजातीचे बीज रोपन करण्यात आले. याव्यतिरिक्त विविध स्थानिक प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. याठिकाणी एक शेततळे खोदण्यात आले असून जुन्या विहिरीचे देखील पुनरज्जीवन करण्यात आले आहे. या शेततळ्यात पावसाचे पाणी साचून त्याचा फायदा या वनस्पतीना होणार आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कास पठारला युनेस्कोने हेरिटेज दर्जा बहाल केला आहे. कास पठाराप्रमाणेच औरंगाबादेतील काही भागात तुरळक प्रमाणात पुष्पवृक्ष दिसतात. याच गवत पुष्प, पुष्प वृक्षांच्या संख्येत कास पठारावरील ७० ते ८० प्रकारच्या प्रजातींची भर घालण्यात येईल. तीन टप्प्यात ‘झकास पठार’ हा नाविन्यपूर्ण प्रकल्प जिल्हा परिषदेकडून आगामी सात वर्षात राबविण्यात येणार आहे, त्याचाच हा पहिला टप्पा आहे. तीन टप्प्यातील या प्रकल्पाचा मुख्य हेतू पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यातून स्थानिकांना रोजगार मिळवून देणे. सुरूवातीच्या पहिल्या टप्प्यात पुष्प गवतांची लागवड करणे, त्यानंतर पुष्पवृक्ष आणि शेवटी वनौषधींची लागवड करण्यावर भर देण्यात येईल, असेही डॉ. गोंदावले म्हणाले.
यावेळी सारोळा येथील सरपंच वर्षाताई प्रकाश घुगे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राम लाहोटी, कृषी अधिकारी आनंद गंजेवार, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, विस्तार अधिकारी शिवाजी साळुंके, विस्तार अधिकारी के एस गायकवाड, प्रकल्प अधिकारी स्वप्नील सरदार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी तांबे, वनपाल आर एस देशमुख, वनरक्षक देवकर, ग्रामविकास अधिकारी जे डी शिंदे, ग्रामसेवक एफ इ सोनवणे, बी के साळवे, एस जी काळे, कृषी अधिकारी दीक्षित, सुदर्शन मामेडवार, मिलिंद गिरधारी आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा निर्बंध पुन्हा नव्याने लावावे लागतील ; वडेट्टीवारांचा इशारा
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..


