🕒 1 min read
मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधक पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगलेली पाहायला मिळतं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या गैरहजेरीत एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाल्याचे दिसत आहेत. यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?
अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनहिताचे काय निर्णय केले, हे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही राहिलंच नसल्यामुळे कोण कुणाच्या खुर्चीवर बसलंय यावर बोलत आहेत, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना फटकारलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, त्या खुर्चीवर कुणी एखादी व्यक्ती बसली, तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही.
स्टेट वाईल्डलाईफ बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही उपाध्यक्ष म्हणून ही बैठक चालवायची आहे. त्यामुळे त्या खुर्चीवर मी बसलो, तर काहीतरी चुकलंय, असा त्याचा अर्थ होत नसल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेचा एक नेता राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी कशा पद्धतीने खुर्ची घेऊन धावत गेला, हेही महाराष्ट्राने पाहिलं असल्याचं म्हणत, मुनगंटीवरांनी शिवसेने पक्षालाही याठिकाणी लक्ष्य केलं आहे.
श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण –
दरम्यान, व्हायरल फोटोवरून स्वत:श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.मला वाटतं हे सर्व हस्यास्पद आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम आहे. त्यांच्या गैरहजेरीत कोणाला सांभाळायची गरज नाही. हे आमचं ठाण्यतील निवासस्थान आहे. आम्ही दोघं इथे असतो मी कुठे मंत्रालय वर्षा बंगल्यावर बसलोय असं नाही हे आमचं ठाण्यातील घर आहे. आम्ही दोघेही या ठिकाणी बसतो लोकांचे गाऱ्हाणे एकतो. इथे मुख्यमंत्री बसतात मोवेबल बोर्ड आहे. हि घराची व्यवस्था आहे. मुख्यमंत्री खुप सक्षम आहेत. विरोधकांच्या पायाची वाळू सरकायला लागली आहे. लोकांना माहीत आहे कोण काय करत. आपण कोण काय म्हणतय याकडे लक्ष देत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Fact Check | पुण्यात खरचं मुलं पळवणारी टोळी आहे का?
- Devendra Fadnavis | गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेले स्वप्न सरकारने पूर्ण केले – देवेंद्र फडणवीस
- Shrikant Shinde | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याच्या आरोपांवर श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण
- Chandrashekhar Bawankule | “उरलेले दोन चारजण वाचवा, नाही तर…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- New Smartphone Launch | Tecno Pova Neo 5G ची लॉन्चिंग तारीख जाहीर, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
