Share

Fact Check | पुण्यात खरचं मुलं पळवणारी टोळी आहे का?

Published On: 

पुणे – पुणे शहरातील प्रामुख्याने कोंढवा, वानवडी, हडपसर आणि इतर अनेक भागांमध्ये शालेय मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेंमध्ये भर पडली आहे. तर अशी कोणतीही टोळी शहरामध्ये कार्यरत नाही आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन परिमंडळ पाठच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मीडियाशी बोलताना केलं आहे.

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना म्हणाल्या, कोंढवा, वानवडी, हडपसर आणि इतर अनेक भागांमध्ये मुलं किडण्याप करण्याचे मेसेज सोशल मीडिया वर फिरत आहे. हे मेसेज चांगल्या हेतूने जरी शेअर केले असतील तरी अशा मेसेजमुळे पालक पॉनिक होतात. आम्ही सर्व शाळांमध्ये चौकशी केली आहे, अशी कुठलीही घटना या परिसरामध्ये घडली नाही. अशा अफवा पुण्यातच नाही तर मुंबई , पुणे, नाशिक आणि इतर शहरांमध्ये देखील पसरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मसेज-

यावर नम्रता पाटील म्हणाल्या की, अशा कोणत्याही अफवा पसरू नका, असा प्रकार जर खरचं घडला तर आम्ही त्यावर नक्की कारवाई करू. आपल्या मुलांना कुणा अनोळखी माणसासोबत बोलू नका, कुणी काही खायला दिला तर घेऊ नका एवढ्या बेसिक गोष्टी जरी पालकांनी आपल्या मुलांना शिकवल्या तर त्यांची मुलं सुरक्षित राहतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!