Share

Chandrashekhar Bawankule | “उरलेले दोन चारजण वाचवा, नाही तर…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातील 50 आमदार आणि12 खासदार आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे शिवसेना पक्ष संपूर्ण कोलमडुन गेला आहे. शिंदेंनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असं चित्र पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर सतत आरोप, टीका करत असतात. अशातच भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना बावनकुळे असंही म्हणाले, एक दिवस ते चारच लोक राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था होईल. त्यामुळे टीका करणं सोडा. त्याचबरोबर शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत, असं म्हणत बावनकुळेंनी शिवसेना पक्षाच्या जन आक्रोश मोर्चावरही टीका केली आहे.

तसेच, शिवसेनेच्या गोरेगावमधील मेळाव्यात ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून त्यांची मोठी भाषण सुरू आहेत. भाषण करताना उद्धव ठाकरेंनी विचार करून बोललं पाहिजे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे, त्यामुळे त्यांचं नाव घेऊन बोलू नये, असा इशाराही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!