Share

Devendra Fadnavis | गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेले स्वप्न सरकारने पूर्ण केले – देवेंद्र फडणवीस

Published On: 

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ आज झाला आहे. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे मार्गाचा शुभारंभ झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी बोलता देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न या सरकारने पूर्ण केल्याचे सांगितले. पुढील काळात वेगाने काम पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अखेर आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गावर धावली पॅसेंजर रेल्वे

1995 साली हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. मात्र आज अखेर 22 वर्षांनंतर या लोहमार्गावर प्रत्यक्ष पॅसेंजर रेल्वे धावली, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी आष्टीकरांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगर आणि बीड या दोन जिल्ह्याला हा मार्ग जोडला गेला आहे. दिवंगत केशर काकू क्षीरसागर, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी यासाठी मोठे प्रयत्न केले होते. या लोहमार्गाचे लोकार्पण झाले असून आजपासून नियमित ही रेल्वे धावणार आहे.

मार्च 2023 पर्यंत बीड पर्यंत रेल्वे धावेल, असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तर  पुढील काळात अतिशय वेगाने या पुढचं काम पूर्ण होईल, असं माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!