Share

‘अचानक एवढी देशभक्ती ते पण ट्विटर वर…’ मिक्का सिंहने घेतली कंगनाची शाळा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं की, ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे’.कंगनाच्या या ट्विट मुळे सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत होता या ट्विट मुळे कंगना बरीच ट्रोल झाली नंतर कंगना कडून हे ट्विट डिलीट करण्यात आले होते.

या मुद्यावरून कंगनाविरोधात गायक मिका सिंग यानेही संताप व्यक्त केला आहे. तुला थोडी तरी लाज वाटायला हवी होती आणि तुझ्यात आता ही थोडे फार शिष्टाचार असतील तर त्या शेतकरी आजींची माफी माग, असे मिका सिंगने म्हटले होते.

दरम्यान कंगना रणौतने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत जी वक्तव्य केली होती त्याविरोधात तिला कायदेशीर नोटीस येणार अशा चर्चा पसरू लागल्या. यावर बोलताना कंगनाने ट्वीट केलं, ‘फिल्म माफियांनी माझ्यावर अनेक केसेस लावल्या आहेत. जावेद अख्तर यांनीही माझ्यावर एक केस केली. महाराष्ट्र सरकारदेखील माझ्यावर केसेस करतच असतं. आता पंबाजमधील काँग्रेस सरकारने तेच केलं आहे. ही लोकं माझ्यावर केस करुन मला महान बनवणार आहेत. त्याबद्दल धन्यवाद.’ अशाप्रकारचं उपरोधित ट्वीट कंगनाने केलं होतं.

कंगनाच्या ट्वीटवर मिक्का सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. मिक्का सिंहने ट्वीट केलं, ‘तुझं टार्गेट नक्की कोण आहे हे तरी समजू दे. तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे तर ते अभिनयामध्ये दाखव ना. तुझ्यात अचानक एवढी देशभक्ती कुठून जागी झाली?’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!