Share

‘हे हिंदू गद्दार आहेत’; युवराजच्या वडिलांची शेतकरी आंदोलनामध्ये वादग्रस्त वक्तव्ये

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत.केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय.

विज्ञान भवन येथे शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि कृषिमंत्री यांच्यात चर्चेनंतरही तोडगा निघत नसल्याचं दिसत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणासाठी पोहोचलेल्या माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग यांनी हिंदूंबाबत कथित रुपाने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनात हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर योगराज सिंग यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.  ‘महाराष्ट्र देशा’ योगराज सिंग यांच्या या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

दरम्यान, योगराज हे या व्हिडीओमध्ये पंजाबीमधून भाषण करताना दिसत आहेत. यामध्ये ते हिंदूंना ‘गद्दार’ म्हणताना दिसत आहेत. ”हे हिंदू गद्दार आहेत, त्यांनी शंभर वर्षे मोगलांची गुलामी केली.” असे म्हटले आहे. यानंतर त्यांनी महिलांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, आता सोशल मिडीयावर अतिशय तीव्र भावना नेटकरी व्यक्त करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!