Share

तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक

Published On: 

अहमदनगर : शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे.

संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती. ‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?’ असा सवाल करत त्यांनी शिर्डी संस्थानने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असा इशारा त्यांनी दिला होता.

दरम्यान, श्रध्दा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे म्हणूनच पुन्हा एकदा संस्थानला तृप्ती देसाई यांनी विनंती केली आहे की “आपण सदर बोर्ड तातडीने काढून टाकावा अन्यथा 10 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आम्हाला शिर्डीत येऊन तो बोर्ड काढावा लागेल.”

दरम्यान, आता हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील ड्रेसकोडप्रकरणी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी हा इशारा दिला आहे.दैनिक सामनाने या संदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!