Share

औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनचा यशस्वी पुढाकार; पाच हजार मोकाट श्वानांचे मोफत लसीकरण!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: कुत्रा हा सामाजिक प्राणी आहे. मानवी वस्तीमध्ये राहत असलेल्या या प्राण्याला केवळ द्वेष करून संपविणे हा त्यावरील उपाय नाही तर त्याचे आणि आपले सहजीवन सुकर करणे यासाठी प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील मोकाट श्वान आणि नागरिक यांच्यात समतोल राखण्यात औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन (APLA) यशस्वी झाली आहे. लोकांमध्ये अखंड जनजागृती करून आज शहरातील मोकाट श्वान दंशाचे प्रमाण अत्यल्प झाले असून पाच हजारांहून अधिक मोकाट श्वानांना मोफत लसीकरण करून शहर रेबीज मुक्त करण्यात हातभार लावला आहे.

शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा बसविण्यासाठी प्राणीमित्रांच्या मदतीने शहरातील पाच हजार श्वानांचे निर्बीजीकरण करून घेण्यात आले. मोकाट श्वानांना जडणारा त्वचाविकार ही एक गंभीर समस्या असून या समस्ये चे निवारण करण्यासाठी APLA तर्फे मोफत औषधोपचार आणि इलाज केल्या जाते. शाळांमधून कार्यशाळा घेवून श्वान आक्रमक का होतात, श्वान दशानंतर प्रथमोपचार आणि नंतर घेण्यात येणारी काळजी याबाबत मुलांना मार्गदर्शन केले जाते.

पशुवैद्यक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जखमी, आजारी श्वानांवर त्वरित इलाज करून प्राणीमित्रांना औषधी किटचे वितरण करते. दत्तक घेतलेल्या भारतीय प्रजातीच्या श्वानांना मोफत लस,औषधे आणि अन्न पुरविल्या जाते. ही संस्था शहरातील मोकाट श्वानांसाठी अन्न, जलकुंड याची व्यवस्था सतत बघत असते. प्रत्येक सजीवाला जगण्याचा हक्क आहे त्यासाठी समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. संस्थेच्या संचालिका बेरील सांचिस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!