क्रिकेटवेड्या भारतात चाहत्यांना अजून एक उत्कंठावर्धक सामना बघायला मिळणार आहे. वेस्टइंडीजच्या आगामी भारत दौऱ्यानंतर, २५ फेब्रुवारी पासून श्रीलंका क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताच्या क्रिकेट दौऱ्यात श्रीलंका ३ टी-२० सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात होणाऱ्या २ कसोटी सामन्यांपैकी एक कसोटी सामना बेंगळुरूच्या एम.ए.चिन्नास्वामी मैदानावर खेळवण्यात येणार आहे. हाच बेंगळुरू मध्ये खेळवण्यात येणारा कसोटी सामना डे अँड नाईट प्रकारात आयोजित करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विचार करत आहे. डे अन नाईट कसोटी सामन्यालाच ”पिंक बॉल” कसोटी सामना असेही म्हंटले जाते. २५ फेब्रुवारी पासून श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिका सुरु होणार आहे.
यात २ कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या २ कसोटी सामन्यांपैकी एक सामना बेंगळुरू येथे तर दुसरा मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. डे अँड नाईट कसोटी म्हणजेच पिंक बॉल टेस्ट मध्ये बॉल मोठ्या प्रमाणात स्विंग होतो आणि फलंदाजांना पण एक प्रकारचे आव्हान निर्माण होते. भारताने मायदेशातील प्रथम पिंक बॉल कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळला होता.
विराट कोहलीने कर्णधार पद सोडल्यानंतर हा भारताचा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. विराट कोहली ने आधी मर्यादित षटकांच्या सामन्यांचे कर्णधार पद सोडले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या अयशस्वी दौऱ्यानंतर त्याने कसोटी संघाचे पण कर्णधार पद सोडले आहे .
विराट कोहलीने कसोटी कर्णधार पद सोडल्यानंतरचा हा पहिलाच सामना असल्याने भारताच्या कसोटी संघाची धुरा कोण खांद्यावर घेणार आणि श्रीलंकेच्या आगामी भारत दौऱ्यात भारताला यश मिळणार का ?? या प्रश्नांकडे देशातील समस्त क्रिकेट प्रेमी डोळे लावून बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- “दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती
- अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन
- U19WC: भारतीय संघाचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनल सामना
- २ कोटी रोजगारांच्या घोषणेवरून राज्यसभेत भाजपला घेरले
- “वॉर्ड बदलेले तरी…”; मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

