Share

Gangubai Kathiawadi : ‘गंगुबाई’ सुसाट… पाच दिवसात तब्बल ५५ कोटी रुपयांची केली कमाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आलिया भट्टच्या गंगुबाई या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचे दिसून आले आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. या प्रमाणे ५ दिवसात बॉक्स ऑफिसवर एकूण ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंतचे आकडे पाहता पहिल्या आठवड्यात हा चित्रपट ७० कोटींहून अधिकची कमाई करू शकतो, असे मानले जाते. दरम्यान आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई केली. पाचव्या दिवशी देखील चित्रपटाची घोडदौड सुरूच होती. पाचव्या दिवशी ‘गंगुबाई’ने ९ ते ९.५कोटींची कमाई केली. यामुळे चित्रपटाने ५५ कोटींचा आकडा पार केला. असेच कलेक्शन सुरु राहिले तर १७५ ते १८० कोटींच्या घरात चित्रपट कमाई करेल असा अंदाज आहे. चित्रपट सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिकमधून जवळपास ११० कोटींची कमाई अपेक्षित आहे. थिएटरमधून जवळपास ६५ कोटींची कमाई होऊ शकते असा अंदाज आहे. या चित्रपटात आलिया भट्टने गंगुबाई काठियावाड हे पात्र साकारलं आहे.

‘गंगुबाई’ सुरुवातीपासून चर्चेत

‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटात करीम लाला हा गंगुबाई हिला आपली बहीण मानतो. गंगुबाईला जेव्हा कोणीही मदत करत नाही तेव्हा करीम लाला तिच्या मदतीसाठी पुढे येतो. ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकाचे लेखक एस. हुसैन जैदी यांच्या म्हणण्यानुसार गंगुबाई ही गुजरत येथील काठियावाड येथील रहिवासी होती. त्यामुळे तिला गंगुबाई काठियावाडी म्हटलं जात होतं. तिला तिच्या पतीने ५०० रुपयात विकलं होतं. आयुष्यात आलेले आव्हान स्विकारता गंगुबाई परिस्थितीचा सामना करत कशी लढते यावर चित्रपटाची कधा आधारित आहेत.

या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!