🕒 1 min read
मुंबई : कृषिप्रधान देशातल्या बळीराजाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. २० ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना काही वर्षांपूर्वी समोर आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा घडली आहे.
सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या नजरेस आले.
सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून जाधव यांनी आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये आपल्यासोबत कशाप्रकारे अन्याय झाला, याची व्यथा मांडली होती. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप त्यांनी केला होता.
सुभाष जाधव यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होता. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांची आज प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घटनांवर मोठा फरक पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांना सोडवा’ ; श्रीलंकेचे भारताला साकडे
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
- भावा-बहिणीच्या अतूट नात्याची शंभरी; बारामतीतील या जोडीची होतेय चर्चा
- ‘अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांना सोडवा’ ; श्रीलंकेचे भारताला साकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
