🕒 1 min read
नवी दिल्ली : शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाश शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडले. यातील १६ आमदारांविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. त्या १६ आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने दाखल केली. असंवैधानिक मार्गाने शिंदे सरकार स्थापन करण्यात आले आहे, हे सरकार बेकायदेशीर ठरवावे. ठाकरेंसोबतची शिवसेना हीच खरी शिवसेना असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे ठाकरे गटाकडेच राहू द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान, यावर आज सुनावणी होणार आहे.
ठाकरे गटाच्या वतीने शिंदे गटाच्या विरोधात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी ठोस युक्तिवाद करण्यात आला. त्या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील तारीख १ ऑगस्ट दिली होती. नंतर ती तारीख बदलून ३ ऑगस्ट करण्यात आली. आता आज शिंदे सरकारच्या भवितव्याचा सर्वोच्च निर्णय होणार आहे.
शिंदे गटाचे अन्य पक्षात विलीनीकरण हाच एकमेव मार्ग-
गेल्या वेळी शिंदे गटाने असा दावा केला होता की, पक्षातील बहुमताला नेतृत्वात बदल व्हायला हवा असे वाटत असेल आणि आमदारांनी बहुमताने नवा नेता निवडला तर त्यात गैर ते काय. तर कोणत्याही पक्षाचे आमदार-खासदार एकत्र करुन पक्षावर अधिकार नाही सांगता येत, असा युक्तिवाद शिवसेनेने केला होता. शिवसेना पक्ष हजारो-लाखो कार्यकर्त्यांनी बनलेला आहे. याबाबत कायदा स्पष्ट आहे की कोणताही गट कोणत्याही पक्षापासून वेगळे होऊ शकत नाही आणि पक्षावर आपला अधिकार गाजवू शकत नाही. त्या गटाचे अन्य पक्षात विलीनीकरण हाच एकमेव मार्ग आहे.
सुनावणीतूनच ठरणार की खरी शिवसेना कोण?
आपल्याला न्याय मिळेल, असे दोन्ही गटांना वाटते. सत्य त्यांच्यासोबत आहे. कोणाकडे तथ्य आहे, हे सर्वोच्च न्यायालय आज ठरवेल. न्यायालयाने हा घटनात्मक मुद्दा मानला आहे, त्यानंतरच आज तीन सदस्यीय खंडपीठ त्यावर सुनावणी करत आहे. या सुनावणीतूनच ठरणार की खरी शिवसेना कोण? उलट हे देखील ठरवले जाईल की सभापती आणि राज्यपालांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? पक्षांतर विरोधी कायद्याबाबतही जो गोंधळ आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो केवळ महाराष्ट्र आणि शिवसेना किंवा शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणार नाही, तर भविष्यात भारताची लोकशाही हेराफेरीने चालणार की राज्यघटनेच्या मर्यादेत चालणार हेही ते ठरवेल.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करू नये – नीलम गोऱ्हे
- CM Eknath Shinde : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
- Uday Samant : शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष पेटला, उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक!
- CWG 2022 : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल’; वाचा सविस्तर!
- VIDEO – माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
