सिंधुदुर्ग: बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे , उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उल्लेख घेणे टाळले.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे जेव्हा बोलायला उभे राहिले. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांचं नाव घेतलं. तसंच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाच्या विकासात हे चिपी विमानतळ एक मैलाचा दगड ठरेल असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी सुभाष देसाई यांनी कोणत्याही गोष्टीच्या यशाला पायगुण लागतो. तसेच वर्षांपासून योजनेत असलेल्या चिपी विमानतळाच्या याशासाठीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पायगुण लाभला. आणि आज त्याचे उद्घाटन म्हणजेच मुख्यमंत्री ठाकरेंचा पायगुण असल्याचे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. तसेच यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही मोलाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळासाठी सतत पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नियम मोडून तुळजाभवानीचे दर्शन, भाजपच्या आचार्य तुषार भोसलेंविरुद्ध गुन्हा दाखल
- ‘फडणवीसांना निमंत्रण नाही, हिसाब तो जरूर होगा!’, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
- ‘उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर बसणे ही चांगली गोष्ट, हा योग अनेक वर्षांनी येतोय’ नारायण राणेंची प्रतिक्रिया
- ‘उद्घाटनाच्या वेळेला कोणतेही राजकारण करणार नाही’, नारायण राणेंकडून तलवार म्यान
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले’, भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
