Share

मोठी बातमी : १ मे पासून राज्यात लसीकरण सुरु होणार नाही; राजेश टोपेंचा महत्वाचा खुलासा

Published On: 

मुंबई : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यात १८ ते ४४ वयोगटातील जनतेचं लसीकरण राज्य सरकारमार्फत केलं जाणार आहे. याचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असून लसीकरणाच्या खर्चासाठी ६५०० कोटी रुपये सरकारतर्फे खर्च करण्यात येणार आहे.’

यासोबतच, ‘पुढील सहा महिन्यात या वयोगटातील लसीकरण करायचे असल्यास एका महिन्याला २ कोटी नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. मात्र, देशात सध्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपनीचे लस उपलब्ध आहेत. कोव्हीशील्डने महिन्याला १ कोटी लसींचा पुरवठा करण्यास समर्थता दर्शवली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रशियन लस स्फुटनिक याबाबत विचारशील आहेत. यासोबतच, इतर कंपन्यांच्या लसी देखील आयात करण्याची तयारी सुरु आहे. मात्र, सध्या उपलब्ध साठा नसल्याने इच्छा असूनही १ मे पासून मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे शक्य नाही.’ असं भाष्य टोपेंनी केलं आहे. त्यामुळे १८ वर्षांपुढील नागरिकांना काहीशी वाट बघावी लागणार असून संयम बाळगावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘लसीकरणासाठी नोंदणी करण्यासह स्लॉट बुकिंग करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ नये याबाबत तयारी सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणास सुरुवात केली जाईल. लस ही फक्त राज्य शासनाच्या सरकारी रुग्णालयातच मोफत दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी पैसे मोजावे लागतील.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!