Share

‘झोमॅटो गर्ल’ म्हणून दीपिका झाली ट्रोल…

Published On: 

मुंबई : बॉलिवूड  मस्तानी दीपिका पादुकोन सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. दीपिका तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत काम करणार आहे. ‘पठाण’ चित्रपटाचं शूटिंग आता स्पेनमध्ये होणार आहे. ज्यासाठी शाहरुख खान, दीपिका आणि जॉन अब्राहम स्पेनला रवाना झाले आहेत. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लुकचा बोलबाला आहे. एकीकडे शाहरुख खान स्टायलिश लुकमध्ये दिसला. त्याचवेळी ‘पठाण’ ची अभिनेत्री दीपिका असा ड्रेस परिधान करून एयरपोर्टवर पोहोचली की नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दीपिका पादुकोण तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती असे काही पोशाख परिधान करते की सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. आज अभिनेत्री आपल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना झाली आहे. पण तिने एयरपोर्टवर जो लुक कॅरी केला होता तो सोशल मीडिया यूजर्सना आवडला नाही, त्यानंतर त्यांनी दीपिकाची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिकाने लाल रंगाचा टर्टल नेक टी-शर्ट आणि लेदर पॅन्ट घातली होती. यासोबतच तिने लाल रंगाची टोपीही घातली होती. तिने पायात उंच पेन्सिल हील्ससुद्धा घातल्या होत्या. हे सर्व पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर लोक तिच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवू लागले आहेत. दीपिकाला या अवतारात पाहून चाहत्यांना रणवीर सिंहची आठवण येत आहे.

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर, विरल भयानीने दीपिकाच्या एअरपोर्ट लुकच्या व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर कमेंट करून अभिनेत्रीची खिल्ली उडवली जात आहे. एका यूजरने लिहिले – ‘ही रणवीर सिंह बनली आहे.’ दुसऱ्या एकाने लिहिले – रणवीर सिंहचा प्रभाव पडणं तर साहजिकच होतं. आणखी एकाने लिहिले – ‘तिची स्टायलिस्ट कोण आहे?’ दुसर्‍याने लिहिले – ‘झोमॅटो गर्ल.’ सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर अशा कमेंट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!