बुलडाणा: राज्यातील शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत, ग्रामीण भागात तर १५ दिवसापासून वीज गायब आहे, अगोदरच रात्रीची वीज केवळ एक तास मिळते, ती देखील कमी दाबाची मिळत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही, शेतकरी रात्र जागवून पिकांना पाणी देण्यासाठी विजेची वाट पाहतोय, मात्र वीज वितरण कंपनी याकडे पूर्णता दुर्लक्ष करीत आहे, असं संतप्त शेतकरी म्हणाले आहेत.
त्यामुळेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मतदार संघातील देऊळगाव मही येथील काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत, विषाच्या बाटल्या घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यलयात स्वतःला कोंडून घेतले होते. जोपर्यंत वीज देत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही, तात्काळ विज सुरू करा अन्यथा विष घेऊन आत्महत्या करतो, अशी भूमिका या कोंडून घेतलेल्या शेतकऱ्यांनी घेतल्याने एकाच गोंधळ उडाला.
घटनास्थळी देऊळगांवराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी पोहोचले, मात्र शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे, पोलीस हतबल झाल्याचे दिसून आले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देऊळगाव मही परिसरातील लाईन वीज तात्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून …केदार शिंदेंची ‘झुंड’ चित्रपटावर प्रतिकिया
१५ लाख खात्यात जमा होण्यावरून राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका ; म्हणाले कि…
गेल्या चार तासांपासून चौकशी सुरू; पोलिस ठाण्याबाहेर राणे समर्थक आक्रमक
“यांचा सत्तेचा माज जनताच उतरवेल”; नितीन गडकरींचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

