पुणे : कोरोना कालखंडात सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली असल्याचे चित्र आहे. अनेकांचे धंदे बुडाले आहे, अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. दरम्यान, एका बाजूला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शालेय शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
अनेक शाळांनी शालेय शुल्क वसुली मोहीम सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळांनी हे शुल्क भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला आहे. दरम्यान, कोरोना काळातील आर्थिक अडचणींमुळे शालेय शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्व परीक्षेपासून वंचित ठेवू नये अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.
काही शिक्षण संस्था याबाबत कठोर वागत असून त्याना रोखण्यात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हतबल ठरल्याने भीम आर्मी तर्फे २६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता त्याना ‘हतबल शिक्षण आयुक्त पुरस्कार’ देऊन गांधीगिरी करणार आहे. हे गांधीगिरी आंदोलन सेंट्रल बिल्डिंग मधील शिक्षण आयुक्त कार्यालयात करण्यात येणार आहे. भीम आर्मी तर्फे पुणे शहरअध्यक्ष तेजिंदर सिंह अलुवालिया, कार्याध्यक्ष मुकेश गायकवाड, सरचिटणीस प्रदीप कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील
- ‘विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मेट्रोने जोडणार’, नितीन गडकरींची घोषणा
- ‘बायकोने मारले तरी म्हणतील की यात मोदी सरकारचा हात आहे!’, फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

