🕒 1 min read
औरंगाबाद : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे. ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’चा वापर करून आपण नवीन कौशल्य आत्मसात करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’चा वापर नवनवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी करावा असे प्रतिपादन देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीजच्या (डीआयटीएमएस) संचालिका डॉ. अनुया चांदोरकर (Anuja Chandorkar) यांनी केले.
‘डीआयटीएमएस’मध्ये बीबीए, बीसीए, बीसीएस विद्याशाखांमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी देवगिरी महाविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर सभागृहात नुकताच दोन दिवसीय पदवी परिचय समारंभ (इंडक्शन) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘डीआयटीएमएस’च्या संचालिका डॉ.अनुया चांदोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.चांदोरकर म्हणाल्या की, वेळेला आज विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे. हरवलेले सर्व काही परत मिळवता येते परंतु गेलेला वेळ परत आणता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेची संरचनात्मक कामासाठी गुंतवणूक करावी.
महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कौशल्यावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात येतात. या प्रत्येक उपक्रमात आपण सक्रिय पणे सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. प्रमुख पाहूणे केरॉन वैष्णव यांनी बहु कौशल्य आणि परदेशी विद्यापीठांमध्ये उपलब्ध शिक्षणाच्या संधी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर डॉ.पल्लवी भालेराव यांनी विद्यार्थ्यांशी संबंधित महाविद्यालयीन आचार संहितेबाबत मार्गदर्शन केले. जितेंद्र झा यांनी महाविद्यालयातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. प्रा.रमण करडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस अडचणीत?
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र
- दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही?- दीपक केसरकर
- ‘राणेंना एवढे महत्त्व कशाला’; पेडणेकरांचा खोचक सवाल
- ‘तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, अजित पवारांना जातीयवादी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
