Share

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण अफ्रिकेमध्ये (South Africa) सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाने पुन्हा धास्ती घेतली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने आवश्यक ते खबरदारीची पावले उचलत आहेत. कोरोनाची लाट ओसरली नाही तोच या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. राज्यामध्येही या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) पत्र लिहिले आहे.आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्राद्वारे ओमायक्रॉन कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या केल्या आहेत. हे पत्र आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.

आदित्य ठाकरेंनी केलेल्या मागण्या-

  • कोरोना योद्ध्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • कोरोना लसीकरणाची किमान वयोमर्यादा १५ वर्षांपर्यंत करण्यात यावी.
  • दोन लसींच्या डोसमधील कालावधी चार आठवड्यांचा करावा.

दरम्यान, शनिवारी डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळला होता. त्यानंतर पिंपरीतील सहा, पुण्यातील एक तसेच आळंदीतील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले होते. आता अजून दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या १० वर पोहोचली आहे. देशामध्ये महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉन रुग्ण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!