Share

दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही?- दीपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर(Dipak Kesarkar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. एका दिवसामध्ये ३६ लाख कोणी भरलेत? याची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्हाला का भरत येत नाही? असा सवाल करत जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग केसरकरांनी फुंकले आहे.

शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत(Satish Sawant) यांचे निकटवर्तीय प्रकाश गवस यांना ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून राणेंवर निशाणा साधत केसरकर म्हणाले की,’याच प्रवेशासाठी एका दिवसात ३६ लाख कोणी भरलेत? याची चौकशी झालीच पाहिजे. इतकेच नव्हे तर दुसऱ्याचे जर आपण अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्ही का नाही भरत? जर कोणी कोट्यवधी रुपयांच्या फायद्यासाठी अडीच कोटी भरणार असेल. तर ते फायद्यासाठी कोणीही करणार. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणारे व्यापारी आहेत. त्याच्यामुळे गुजरातीमध्ये अशी म्हण आहे की, ‘राजा व्यापारी, प्रजा भिकारी’. ही म्हण नेहमी कोकणी लोकांनी लक्षात ठेवावी. आणि जे असे व्यापर करणारे राजकारणी आहेत, त्यांच्यापासून बोध घेऊन अशा राजकारणी लोकांच्या हातामध्ये ही बँक जाऊ नये याच्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलावी.’

दरम्यान, ते जर इथे डीफॉल्टर असतील तर ते आणि काय करणार आहेत? ते अमित शहांचे कर्ज घेऊन आणि डीफॉल्टर होतील. यापलीकडे काय करू शकणार नाहीत. बँक ही डीफॉल्टरवर चालत नाही, बँक ही चांगल्या ठेवीदारांवर आणि चांगल्या कर्जदारांवर चालते आणि ते चांगले कर्जदार नाहीत, हे हायकोर्टाने सांगितले आहे. तुम्ही थकबाकीमध्ये आहात. त्यामुळे इथे लोकांनी विचार केला पाहिजे की, असे जे बँकेची कर्ज घेऊन ते डीफॉल्टर आहेत, अशा लोकांच्या आव्हानाला लोकांनी किंमत देता कामा नये, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!