Share

‘राणेंना एवढे महत्त्व कशाला’; पेडणेकरांचा खोचक सवाल

Published On: 

मुंबई: वरळीच्या गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये सिलिंडर स्फोट झाला होता. या घटनेत चार जण होरपळले. यातील काही जणांना नायर तर काही लोकांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने वरळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल केला.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली होती. राणे म्हणाले, वरळीत सिलिंडर स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आधी लहान मुलाचा. नंतर त्याच्या वडिलांचा आणि आता त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या टिके नंतर भाजप आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील महापौर किशोरी पेडणेकर व शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. या टीका व आरोपांवर महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे यांच्या बद्दल बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, नितेश राणेंना एवढं का सिरीयस घेताय, त्यांच्या म्हणण्याला काही बेस नाही. फक्त राजकारणासाठी दिसत राहायचं आणि बोलत राहायचं. यांच्यापैकी कोणी अॅम्ब्युलन्स तरी पाठवली का? शिवसैनिक, कार्यकर्तेच सुरुवातीला मदतीला धावले, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!