Share

‘तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, अजित पवारांना जातीयवादी…’

Published On: 

पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याच्या राजकारणामध्ये मोठा वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता या मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे. यावरुन भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. यावरुन गोपीचंद पडळकरांना राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

पवार कुटुंब ओबीसी (OBC) आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत. तसेच अजित पवारांमुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं आहे. ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा असून अजित पवार यांचा जातीयवाद उफाळून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाला निधी दिला नाही. त्यांच्या मनात ओबीसींबद्दल आकस आहे. त्यांच्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाले आहे, अशी घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर, तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका तुम्हाला अजित परावांना जातीयवादी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सत्तेत असताना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले नाही, मग सत्तेत असताना झोपा काढल्या होत्या का आणि ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरीकल डाटा पाहिजे होता परंतु हा डाटा केंद्राकडे असताना का दिला नाही मग काय वाट बघत बसले होते का ओबीसी आरक्षण कधी रद्द होण्याची, त्यामुळे अजित पवार यांच्या विषयी तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही, अशा शब्दात सचिन खरात यांनी गोपीचंद पडळकरांना खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!