नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आज सोमवारी विद्यार्थ्यांनी चक्क आंदोलन करत रस्त्यावरच शाळा भरवली. हे विद्यार्थी फासेपारधी समाजातील असून आज सकाळपासूनच ते आंदोलनाला बसले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या आश्रमशाळेची जागा समृद्धी महामार्गात गेल्यामुळे आज गडकरींच्या घरासमोर रस्त्यावरच शाळा भरवत हे अनोखं आंदोलन केलं आहे.
समृद्धी महामार्गामध्ये प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची जमीन, शाळेला बारा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर, वाचनालय, खेळाचे मैदान, मुलींचे प्रसाधन गृह इत्यादी गेले असून शासनाकडून याची नव्याने उभारणी करून देण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
या आश्रमशाळेत १ ली ते १० वी पर्यंतचे इयत्ता असून फासेपारधी समाजाचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. समृद्धी महामार्गात त्यांच्या आश्रमशाळेची जागा गेली. इमारत उध्वस्त झाली शासनाकडून याची नव्याने उभारणी करून द्यावी, या मागण्या मान्य व्हाव्यात याकरता आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी गडकरींच्या घरासमोर आंदोलन करत रस्त्यावरच शाळा भरवली. आंदोलन सुरू असताना नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि ते गोव्याकडे रवाना झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या –
- समीर वानखेडेंची बदली झाल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- शिवसेना राष्ट्रवादीने औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ तर भाजपने पीटलाईन पळवली; खा. जलील यांचा आरोप!
- शिवसेनेचा बेरोजगार महिलांना मदतीचा हात; पालकमंत्र्यांच्या हस्ते ७० शिलाई मशिनचे वाटप..!
- यापुढेही संसदेच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन- सुप्रिया सुळे


