कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
यामुळे राज्याच्या विविध भागासह परराज्यातून उपजीविकेसाठी मोठ्या शहरात आलेल्या कामगार-मजूर वर्गाने पुन्हा एकदा आपल्या गावाची वाट धरली आहे. गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन केल्यामुळे मजुरांना अक्षरशः पायी गावी जावे लागले होते. यावेळी त्यांची मोठी हालअपेष्टा झाली होती. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच या लोकांनी गाव गाठण्यासाठी मिळेल रेल्वेसह मिळेल त्या साधनाने गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे.
दरम्यान, लॉकडाऊन होण्याच्या भीतीने परप्रांतीय मजुरांनी महाराष्ट्रातून जाऊ नये, राज्य सरकार त्यांची सोय करेल, असं आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे. कामगार मंत्रीपदाचा कार्यभार देखील आता हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. ते म्हणाले, ‘राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये.’
महत्वाच्या बातम्या –
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- गरिबांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करा, सोनिया गांधींचे मोदींना पत्र
- सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- सचिन वाझे प्रकरणात नवा ट्वीस्ट, चौकशी करणाऱ्या NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

