Share

शुभेच्छा देत राज्यपाल कोश्यारी यांनी केले गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन

Published On: 

नवी दिल्ली: आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आजपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा गुढी पाडवा हा सण मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सणावर कोरोना आजाराचे सावट पडत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र कोरोना संकट नष्ट होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या असून कोरोनामुळे संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करतो. हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरीता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो. युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नागरिकांना मराठीतून खास शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्यदायी आणि खूप भरभराटीचे असावे, ही सदिच्छा, यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!