Share

लॉकडाउनच्या ट्विटनंतर महेश कोठारे सोशल मीडियावर ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. लॉकडाऊन करावा की नाही याबाबत सगळ्यांची वेगवेगळी मतं आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी एक ट्वीट केले असून यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. महेश कोठारे यांनी ट्वीट केले आहे की, लॉकडाऊन हे उत्तर नाहीये.

महेश कोठारे यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत या ट्विट नंतर त्यांना नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले आहे. एक युजर तर म्हणाला यांना कोरोना झाला तर सर्व सोयी सुविधा मिळणार म्हणून बोलायला सूचतयं. थाळी वाजवा तेवढच जमणार तुम्हाला.

तर एका युझरने गेल्या लॉकडाऊनमध्ये हा प्रश्न का नाही विचारला असे म्हटले आहे. अजून एक सेलिब्रेटी भक्त सापडला मागच्या वर्षी झोपलेलात का आपण? त्या वेळी का नाही आठवले एवढे थोर विचार? Lockdown उत्तर नाही तर दुसरे उपाय काय आहे ते ही सांगाल का जनतेला? नुसते आग लावायची कामं आहेत ही. एवढी चांगली जागा बनवली मराठी प्रेक्षकांच्या मनात का अश्या पोस्टने ते खराब करू इच्छिता आपण… असे म्हणत सोशल मीडियावर त्यांचा समाचार घेतला आहे.

महेश कोठारे त्यांच्या या पोस्ट मुळे बरेच ट्रोल होत आहेत. नेटकऱ्यांनी अक्षरशः सोशल मीडियावर त्यांची शाळा घेतली आहे. त्यांच्या या ट्विटवर त्यांचे चाहते देखील नाराज असल्याचे दिसून येत आहे.

https://twitter.com/AZAHARSHAIKH80/status/1381262878833930244?s=20

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!