Share

लातूर; कडक निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

Published On: 

लातूर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यात जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने अंशतः लॉकडाऊन व कडक निर्बंध लावले आहेत, याच्या विरोधात लातूरच्या व्यापारी महासंघाने सोमवारी गंजगोलाईत भीक मांगो आंदोलन करुन शासनाने निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी केली. शासनाच्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागत असल्याने खूप मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापारी बोलत होते.

अनेक व्यापारी-कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासन निर्देशाप्रमाणे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवलेली असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव चालूच आहे. व्यापार चालू असताना व्यापारी वर्ग प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करून आपले व्यवहार पार पाडतात. व्यापाऱ्यांनी स्वत:ची तसेच आपल्याकडे कामाला असणाऱ्या नोकरांची नियमाप्रमाणे कोरोना चाचणी करून घेतली आहे.

तसेच सॅनिटायझर, मास्कचा वापर केला जातो. ग्राहकांनाही आम्ही हे नियम पाळायला भाग पाडतो. असे असतानाही व्यापार बंद ठेवण्याचे बंधन घातले जात आहे.त्यामुळे हनुमान चौकात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी व इतर व्यापाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!