Share

साखर कारखानदारांविरोधात छावाचे जोरदार आंदोलन; संचालकांना ‘ऊस’ भेट!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : खुलताबाद येथील घृष्णेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे उसाचे वाढीव पेमेंट न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत अखिल भारतीय छावा संघटनेने केला आहे. २०१६ ते २०१९ पर्यंतच्या कालावधीत उस उत्पादक शेतकऱ्यांना व्याजासह पैसे देण्यात यावे अशी मागणी साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र साखर आयुक्तांनी याबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या विरोधात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने क्रांतीदिनी सोमवारी (दि.९) पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

शेतकरी व छावाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांंच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करत साखर आयुक्त व कारखानदारां विरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी साखर आयुक्त संचालक मुकणे व सहसंचालक राजेश सुरवसे यांना निवेदन देऊन त्यांना ऊस भेट देण्यात आला. घृष्णेश्वर कारखान्याने इतर कारखाने ऊसाला देतील त्याच भावाप्रमाणे  शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट देऊ असा शब्द शेतकऱ्यांना दिला होता.

मात्र कारखान्याने दिलेला शब्द न पाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना प्रशासनाच्या विरोधात छावा संघटनेने वेळोवेळी पुढाकार घेऊन अनेक वेळा निवेदने, आंदोलन करुनही घृष्णेश्वर कारखान्याने यासंदर्भात कुठलीच दखल घेतली नाही. साखर नियंत्रण आदेश १९५६ अधिनियमानुसार कोणत्याही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या एफ आर. पी. ची रक्कम ऊस कारखान्यात पोहच केल्यापासुन किमान १४ दिवसाच्या आत मध्ये एफ.आर.पी. रक्कम देणे बंधनकारक आहे.

साखर आयुक्त कार्यालयातील अर्थ विभागाने अशा कारखानदारांवर तात्काळ चौकशी समिती नेमुन कारवाई करावी या विषयी छावा संघटनेचे शिष्टमंडळ, कारखानदार व साखर आयुक्त यांंच्यात एक संयुक्त बैठक घेऊन मागण्या मान्य करण्यात येईल असे सांगितले आहे. यापुढे कारवाई झाली नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!