🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री करिना कपूरने २१ फेब्रुवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिच्या दुसऱ्या बाळाची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र अद्याप तिच्या बाळाचे नाव सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे गेली पाच महिने अनेकजण सोशल मिडीयावर करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या नावाबाबात तर्कवितर्क लावत होते. दरम्यान आता पहिल्यांदा छोट्या नवाबचे नाव समोर आले आहे. करिनाच्या ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकात तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ असल्याच सांगितल आहे.
‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकाच्या शेवटच्या पानांवर करीनाने तिच्या गरोदरपणातील आणि त्यानंतरचे काही फोटो दिले आहेत. या फोटोंमध्ये करीनाने दुसऱ्या बाळाचा फोटो देत या फोटोला ‘जहांगीर’ असं नाव दिलं आहे. करिनाच्या धाकट्या मुलाचे नाव समोर येतातच, सोशल मिडियावर याच प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. सध्या यावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
#Taimur#Jahangir
who will be next ?
May Be #AurangzebNew Founder of Mughal Dynasty #KareenaKapoorKhan pic.twitter.com/t3xSi9Q1RE
— Ram Bishnoi ???? (@Ramsa_B) August 10, 2021
सैफिनाला मुगलांची टीम बनावयची आहे, असं एका ट्रोलरनं सैफिनाला ट्रोल करताना लिहिलं आहे. पहिला तैमूर, दुसरा जहांगीर आता तिसऱ्याचं नाव काय असणार? असे प्रश्न काही नेटकऱ्यानी केले आहेत.
Taimur to #KareenaKapoorKhan #SaifAliKhan pic.twitter.com/q8MzaWN8B2
— Ravivaar (@ravi67ravi) August 10, 2021
करिनाने 2016 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवले यावरून यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. करिना व सैफनं पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं, तेव्हा लोक संतापले होते. आता दुसऱ्या मुलाच्या नावावरूनही करिना व सैफला ट्रोल केलं जात आहे. मात्र अद्याप आपल्या दुस-या मुलाचे नाव करिना व सैफनं अधिकृतपणे जाहिर केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट दिलं, पण ताटात काहीच नाही मग खायचं काय?’
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील सातवा शिलेदार ‘नीरज चोप्रा’
- ईडीचा धडाका सुरूच; आता ‘या’ कारखान्याच्या विक्री व्यवहाराची होणार चौकशी
- पतीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा ‘या’ कारणासाठी फेसबूक लाईव्हद्वारे येणार समोर
- ‘प्रताप सरनाईक यांच्या कामाशी स्पर्धा करा’ ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
