Share

‘कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करा ; आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करा’

Published On: 

मुंबई : सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी शक्यता आणि भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरावी किंवा तिची तीव्रता कमी राहावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सजग राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. शिवाय नागरीकांनीही यासंबंधाने असलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

मागच्या काही दिवसात भारतातील एकूण कोवीड१९ बाधित रूग्णसंख्सेत वाढ झाल्याचे दिसून आले असून यात केरळसारख्या राज्यातील वाढ लक्षणीय आहे. या संदर्भाने अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात हळूहळू कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आगामी काही दिवसात ही रूग्णसंख्या अधिक गतीने वाढून ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी भीती तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत.

या सर्व तज्ञ मंडळींचा हा इशारा लक्षात घेता लातूर जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातीलच प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जनतेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या संदर्भाने लागू असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लॉकडाऊन नियमात शिथीलता आणल्यामुळे बहुतांशी औद्योगिक, व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजार सुरू झाले आहेत, असे असले तरी संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यासर्व ठिकाणी कोवीड१९ मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. कोणत्याच ठिकाणी गदी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.

या संदर्भाने प्रशसनाने विशेष लख देणे गरजेचे आहे. शारीरिक आंतर पाळणे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या बाबतीत जनतेने विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, शक्यतो गर्दीतील संपर्क टाळावा, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले घरीच राहतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!