Share

पुण्यात गणेश मंडळांसाठी कडक नियम आणि महापौरांना वेगळा नियम? चेहऱ्यावरचा मास्क गायब

Published On: 

पुणे : आज अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जनाचा दिवस आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदाही राज्यात विसर्जन मिरवणुकांवर बंधन घालण्यात आले आहेत. पुण्यातील मानाचे पाचही गणपतींचे विसर्जन उत्सवमंडपाच्या समोर कृत्रिम हौदात करण्यात येणार आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करण्याचे आवाहन करत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांना देखील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे खुद्द महापौर महोदयांना कोरोनाचा विसर पडलाय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले, यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ विना मास्क दिसले. त्यामुळे त्यांना कोरोना नियमांचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

दुसरीकडे आज कोरोना महामारीचे सावट असल्याने पुण्यात मिरवणुकीला बंदी आहे. मात्र पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यामुळे पोलिसांनी ढोल ताशा पथकाला रोखलं आहे. यावेळी पोलील आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. त्यानुसार आता गणपती मंडळांना एक नियम आणि महापौरांना वेगळा नियम आहे का ? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. आता महापौरांवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!