Share

Budget 2022 : कॉर्पोरेट, सहकार क्षेत्राला अर्थमंत्र्यांचा दिलासा; आता भरावा लागणार ‘इतका’ कर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कर रचनेत बदल करून अर्थमंत्री दिलासा देतील अशी सर्वच देशवासीयांना अपेक्षा होती. मात्र सलग सहाव्या वर्षी कोणताही बदल न झाल्याने नोकरदार वर्गाच्या पदरी निराशा पडली आहे.

दरम्यान सहकार, कॉर्पोरेट क्षेत्राला मात्र सीतारामन यांनी काहीसा दिलासा दिला आहे. या दोन्ही क्षेत्रांना अगोदर १८ टक्के कर भरावा लागायचा मात्र आता या दोन्ही क्षेत्रांना १५ टक्के कर भरावा लागणार आहे. (Corporate and co-operative sector will have to pay 15 per cent tax) याशिवाय सरचार्जदेखील १२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच इन्कम बेस १ कोटीवरून १० कोटी करण्यात आला आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर आता १५ टक्के कर द्यावा लागणार आहे.

तसेच क्रिप्टोकरन्सी संदर्भात सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात २०२२-२३ मध्ये आरबीआय स्वत:चे डिजिटल चलन आणेल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या घोषणेचा मोठा प्रभाव शेअर मार्केटवर दिसून आला. मुंबई शेअर मार्केट १ हजार अंकांनी वधारला असून मार्केटने ५९ हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!