Share

अध्यक्ष गांगुलीचा टीम सिलेक्शनमध्ये हस्तक्षेप का? ; भारतीय क्रिकेटरसिक संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीच्या संघ निवड बैठकीत उपस्थित राहिल्याच्या दाव्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. बीसीसीआय आणि टीम इंडियामध्ये गेले काही महिने अनेक वाद होताना दिसत आहे. विराट कोहली सहा महिन्यांपूर्वी तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता आणि आता तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम सांभाळत नाही. रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय संघांचे कर्णधार बनवण्यात आले आहे. या सगळ्या गोष्टींवरून सतत सौरव गांगुली चर्चेचा विषय बनत आहे.

नुकतेच एका प्रसिद्ध क्रिकेट निगडित कार्यक्रमात बीसीसीआय अध्यक्ष असूनही सौरव गांगुली संघ निवड बैठकांना का उपस्थित राहतो यावर चर्चा केली गेली होती. त्या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार शेअर केली जात आहे. आणि तेव्हापासून लोक गांगुलीबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आहेत. काही चाहत्यांच्या मते गांगुली आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मिळून भारतीय क्रिकेटला उद्ध्वस्त केले आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांनीही तर गांगुलीच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

https://twitter.com/softsignalout/status/1488234040712904704

https://twitter.com/wildcardgyan/status/1488409102040858624

सौरव गांगुली यांचा २०१९ मधील एका टीम सिलेक्शन मिटिंगचा फोटोही जोरदारपणे व्हायरल होत आहे. विराटला कर्णधारपदावरून काढल्यानंतर चाहत्यांकडून सौरव गांगुली यांच्यावर सतत टीका होत आहे. सौरव गांगुली अध्यक्ष म्हणून संघात मनमानी करत ढवळाढवळ करत असल्याचेही चाहत्यांचे म्हणणे आहे. नियमानुसार टीम सिलेक्शनमध्ये बीसीसीआय अध्यक्षांनी कोणतेही हस्तक्षेप करायचे नसते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!